बॉलिवूडचे चाहते त्यांच्या दोन आवडत्या स्टार्सना एकत्र पाहून नेहमीच खूश होतात. अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री करीना कपूर खान ही त्यापैकी एक जोडी आहे. एक काळ असा होता जेव्हा दोघे एकमेकांना डेट करत होते. त्यांचे एकत्र फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर सतत चर्चेत असायचे. पण काही कारणास्तव त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर करीनाने सैफ अली खानशी लग्न केले. पण अनेकदा मुलाखतीमध्ये करीनाने शाहिदवर अनेक आरोप केले होते. आता दोघेही जुने वाद विसरले असल्याचे दिसत आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात करीनाने शाहिदला मिठी मारली आहे.
शनिवारी जयपूरमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला करीना कपूर आणि शाहिद कपूर दोघेही उपस्थित होते. या कार्यक्रमात दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि नंतर त्यांच्या आजूबाजू उभे असलेले लोक देखील चकीत झाले. या कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे.
‘जब वी मेट’मधील गीत आणि आदित्य या हिट जोडीला पाहिल्यानंतर चाहत्यांचा आनंद गगनात मावत नाही. आता इतक्यावर्षानंतर पुन्हा दोघांना एकत्र हसताना पाहून नेटकऱ्यांना आनंद झाला आहे. त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने, ‘दोघेही आता प्रौढ असल्यासारखे वागत आहेत’ असे लिहिले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, ‘चमत्कार, हे पाहून आनंद झाला’ अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या एका यूजरने, ‘अरे देवा, हे काय झाले?’ असे म्हटले आहे.
त्याच इव्हेंटचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये करीना कपूर कार्तिक आर्यनशी गप्पा मारत असते. त्यानंतर शाहिद कपूर तेथे येतो. करीना शाहिदकडे बघून असते आणि त्याला मिठी मारते. ते पाहून शेजारी असलेला कार्तिक आणि क्रिती खरबंदा चकीत होतात.