पवार काका-पुतणे एकाच व्यासपीठावर दिसणार! दोन्ही पवारांकडे राज्याचं लक्ष….

 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत एकाच मंचावरती येणार असल्यानं राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. आमदार रोहित पवार यांची सोशल मीडियावरती यासंबंधीची माहिती पोस्ट केली आहे. बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राच्या कृषीक कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने दोघं एकाच मंचावर येणार आहेत. नमो रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमानंतर शरद पवार आणि अजित पवार बारामतीत पहिल्यांदाच एका मंचावर येणार आहेत, त्यामुळे सध्या हा विषय चांगलाच चर्चेत आला आहे. 

ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने दरवर्षी कृषी प्रदर्शनाचा आयोजन केलं जातं. शरद पवार या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. 16 ते 20 जानेवारी दरम्यान बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रात कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला अजित पवार आणि शरद पवार हे दोघे एकाच मंचावर येणार आहेत. ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित बारामती कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजित दहाव्या कृषिक प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभाला शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे बुधवारी (दि. 15) एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

त्यांच्यासोबत अन्य काही नेते, मंत्री देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.लोकसभा-विधानसभा निवडणुकीनंतर हे दोघे प्रथमच बारामतीत एका व्यासपीठावर येत आहेत. बारामती कृषी विज्ञान केंद्रावर कृषिकचे आयोजन करण्यात आले आहे. 16 ते 20 जानेवारी या कालावधीत हे प्रदर्शन होणार आहे. त्याचे औपचारिक उद्घाटन 15 रोजी होणार आहे.

या समारंभाला शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, पर्यावरण व पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, आमदार रोहित पवार, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार आदी उपस्थित राहणार आहेत. शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे एकाच व्यासपीठावर येत असल्याने त्याबाबत उत्सुकता आहे. कृषी विकास प्रतिष्ठानचे कामकाज राजेंद्र पवार हे पाहतात.