मुंबईत दाखल होण्याआधी मराठा मोर्चाचा मार्ग बदलला

पिंपरी चिंचवड मध्ये जरांगे पाटील यांचं उत्साहात स्वागत झाल्यानंतर लोणावळ्यातील सभेला जाण्यापूर्वी पिंपरी चिंचवडच्या चौका चौकामध्ये मराठा बांधवांनी फटाक्यांची आतिषबाजी करत फुलांची उधळण करत एक लाख मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या.

सध्या लाखो मराठा समर्थकांच्या साथीनं मनोज जरांगे लोणावळ्यात दाखल झाले असून, 26 जानेवारीला हा मोर्चा मुंबईत दाखल होणार असून, त्याआधी मात्र मराठा आंदोलकांनी नाराजीचा सूर आळवला आहे.मराठा आंदोलक मुंबईत दाखल होण्याचा पूर्वनियोजित मार्ग बदलण्यात आला असून आता एक्‍सप्रेस वे ऐवजी जुन्‍या मुंबई पुणे हायवेने येण्‍याच्‍या सूचना आंदोलकांना देण्यात आल्या आहेत. ज्यामुळं मराठा आंदोलकांमध्‍ये नाराजी पाहायला मिळत आहे.

मुंबईत आंदोलनासाठी निघालेले मनोज जरांगे पाटील आणि मराठा बांधवांच्या पदयात्रेचा मार्ग बदलल्‍याने आंदोलकांमध्‍ये नाराजीचा सूर आहे. मराठा आंदोलकांना मुंबई पुणे एक्‍सप्रेस वे ऐवजी जुन्‍या मुंबई पुणे हायवेने बोरघाटातून येण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या आहेत.