सध्या दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये भरपूर वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. ज्यामुळे भीतीचे वातावरण आहेच. दिवसाढवळ्या चोरटे बंद घरे फोडत असल्याचे चित्र आहे. सांगोला तालुक्यातील एखतपूर येथे चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोने हिसकावून नेताना त्या चक्क महिलेला फरपटत नेले . घराबाहेर खेळणाऱ्या मुलांना घरात घेवून जाण्यासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील १ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण व चेन अज्ञात चोरट्याने सिने स्टाईलने काढून पळ काढला.यावेळी सदर महिलेला फरफटत नेले. ही घटना रविवार, दि.१२ जानेवारी रोजी ६.४५ च्या सुमारास मस्के कॉलनी, एखतपूर येथे घडली आहे. याबाबतचे वृत्त असे की, रविवारी सायंकाळी पूनम संदिप गिड्ढे (वय-२८, रा- मस्के कॉलणी नं. ३, सांगोला) या घराच्या बाहेर खेळत असलेल्या मुलांना घरात घेऊन जाण्याकरीता घराच्या बाहेर रोडवर आल्या होत्या.
यावेळी त्यांच्या पाठीमागून एक नंबर प्लेट नसलेली मोटारसायकल आली. सदर मोटारसायकलवर पाठीमागे बसलेल्या इसमाने फिर्यदीचे मानेला धरून त्यांना ओढत नेले व त्यांच्या गळ्यातील ८० हजाराचे २ तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण व ४० हजार रुपये किमतीचे १ तोळ्याची सोन्याची चेन असे एकूण १ लाख २० हजाराचे सोने हिसका मारून काढून नेले. मोटासायकल वरील दोघांनी तोंडाला मास्क लावलेले होते तर मागे बसलेल्या व्यक्तीने फिर्यादीस काही पावले फरफटत नेले, अशी तक्रार पूनम गिड्डे यांनी पोलिसात दिली आहे.