हातकणंगलेत भाजप सदस्य नोंदणी अभियानात प्रतिसाद न मिळाल्याने भाजपमध्ये कमालीची अस्वस्थता

राज्यभरात २५ लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट साधणाऱ्या भाजपकडून राज्यभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. यासाठी राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत अभियानाची सुरुवात करण्यात आली. अनेक ठिकाणी या अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. तर काही ठिकाणी निराशा देखील झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. सदस्य नोंदणी अभियानात हातकणंगलेत प्रतिसाद न मिळाल्याने भाजपमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. विधानसभा निवडणुकीत निष्ठावंत गटाला विश्वास न घेतल्याचा हा परिणाम असू शकतो, असे लोक बोलत आहेत. याचा विपरीत परीणाम आगामी महापालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत होऊ शकतो. त्यामुळे या निवडणुका लढविणाऱ्या इच्छुकांची चांगलीच घालमेल होत आहे.