काँग्रेसचे वरिष्ठ नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या म्हणजेच 4 ऑक्टोबरला कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. कोल्हापुरातील कसबा- बावडा इथं उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राहुल गांधी यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. 4 तारखेला राहुल गांधी यांचा कोल्हापुरातच मुक्कामी असणार आहेत. राहुल गांधी यांच्या या दौऱ्याआधी कोल्हापुरातील काँग्रेसचे बडे नेते, माजी मंत्री सतेज पाटील यांनी विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं आहे.
महाविकास आघाडीत जागा वाटपावर 200 च्यावर जागांवर एकमत झालं आहे, असं सतेज पाटील म्हणालेत.शाहू महाराजांच्या भूमीत आम्ही राहुल गांधींना निमंत्रित केलं आहे. उद्या त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होईल. तर संविधान सन्मान कार्यक्रम होणार आहे आहे. शाहू स्थळाला देखील ते भेट देणार आहेत.
कसबा बावड्यातील भगव्या चौकात हा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय वर्षभर तुम्ही आम्ही घेतला होता. राहुल गांधी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होत आहे. याचा आम्हाला अभिमान आहे, असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देखील राहुल गांधी राज्यातील नेत्यांशी बोलतील. याचा फायदा महाविकास आघाडी म्हणून आम्हाला होईल. मागच्या विधानसभा निवडणुकीत आपण पाहिलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मॅन्डेड पश्चिम महाराष्ट्रातील लोकांनी दिला होता, असं सतेज पाटील म्हणाले.