आनंदाची बातमी! Amul दूधाचे दर होणार कमी……

दूधाचा प्रसिद्ध ब्रँड अमुलने आपल्या दूधाच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २६ जानेवारीच्या आधी ही दर कपात होत आहे. कंपनीने आपल्या तीन दूधाच्या प्रोडक्टचे दर कमी केले आहेत. यात अमूल गोल्ड, अमूल टी स्पेशल आणि अमूल फ्रेश या उत्पादनांचा समावेश आहे. या दूधाच्या उत्पादनाची किंमत एक रुपयांनी कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आधी अमूल गोल्डची किंमत ६६ रुपये होती.

आता हे दूध ६५ रुपयांना मिळणार आहे.तर अमुल टी स्पेशलच्या किंमती ६३ रुपयांवरुन ६२ रुपये होणार आहेत. तर अमूल ताजा या दूधाचा दर आधी ५४ रुपये होता. आता तो ५३ रुपये होणार आहे. ही दर कपात केवळ एक लिटरच्या पॅकसाठी लागू केली आहे.गुजरात कॉपरेटीव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे (GCMMF) व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी ही घोषणा केली आहे. प्रजासत्ताधिकानिमित्त ही घोषणा केली आहे.

त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळणार आहेत. या दर कपाती मागे कंपनीने कोणतेही कारण दिलेले नाही. अमुल प्रथमच किंमती वाढविल्यानंतर अशा प्रकारची दर कपात करीत आहे. आता अमुल पाठोपाठ देशाचा दुसरा एक ब्रँड मदर डेअरीने देखील दूधाच्या किंमतीत कपातीची चाचपणी सुरु केली आहे. विशेष म्हणजे साल २०२४ च्या जून महिन्यातच अमुलने दूधाचे दर वाढविले होते. त्यांनी दोन रुपये प्रति लिटर दूधाच्या किंमती वाढविल्या होत्या.