Mother’s Day 2024 : महाराष्ट्राच्या या धार्मिक स्थळांवर तुमच्या आईसाठी साजरा करा मदर्स डे

दरवर्षी मे महिन्याचा दूसरा रविवार हा मदर्स डे म्हणून साजरा केला जातो. यंदा हा दिवस 12 मे रोजी साजरा केला जाणार आहे.त्यामुळे हा दिवस तुमच्या आईला विशेष वाटण्यासाठी तुम्ही तिला कुठेतरी फिरायला घेऊन जाऊ शकता. तुमची आई धार्मिक विचारांची, पूजा पाठ करणारी असेल तर तिला महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांवर घेऊन जाऊ शकता. असे केल्याने तुमची आईदेखील खूप खुश होईल, आणि आईसाठी हा दिवस खूपच अविस्मरणीय ठरेल.

गणपतीपुळे

महाराष्ट्रातील कोकणात वसलेले गणपतीपुळे हे सुंदर पवित्र शहर आहे. समुद्रकिना-यावरील हे आकर्षक मंदिर आणि तेथील आल्हाददायक वातावरणामुळे तुमच्या आईचे मन प्रसन्न होऊन जाईल.

साईबाबा संस्थान मंदिर शिर्डी

शिर्डी महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख धार्मिक स्थळ आहे, जे नाशिकजवळ आहे. तुम्ही तुमच्या आईला घेऊन साईबाबांचे दर्शन घेऊ शकतात. हे मंदिर जगभरातून येणाऱ्या भाविकांसाठी एक खास ठिकाण आहे.

शनि शिंगणापूर

अहमदनगर जिल्ह्यातील शनि शिगणापूर मंदिर हे एक भव्य आणि अद्वितीय स्थान आहे. जर तुम्ही शिर्डीला जाणारच असाल तर शनि शिंगणापूरला देखील आवर्जून भेट द्या. शनि शिगणापूर मंदिराच्या दर्शनाने जीवनातील सर्व दुर्गुण आणि अडथळे दूर होतात असा भाविकांचा ठाम विश्वास आहे. तुमच्या आईला देखील इथे आल्याचे सार्थक वाटेल.

घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर

औरंगाबाद महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील एलोरा गुहेच्या आत स्थित, असलेले घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे महाराष्ट्रातील प्रमुख शिव मंदिरांपैकी एक आहे. मदर्स डेच्या दिवशी तुम्ही इथे आईला घेऊन जाऊ शकता. महाशिवरात्रीला या मंदिरात प्रचंड गर्दी असते, त्यामुळे घृष्णेश्वराचे निवांत दर्शन घ्यायचे असेल तर महाशिवरात्रीचा दिवस सोडला तर इतर कोणत्याही दिवशी तुम्ही इथे जाऊ शकता.

त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिक

भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर हे नाशिकमध्ये स्थित आहे. हे मंदिर नाशिक शहरापासून 28 किमी अंतरावर आहे. येथे मोठ्या संख्येने भक्त येतात. आईला तुम्ही या मंदिरात देखील घेऊन जाऊ शकता.

सिद्धिविनायक मंदिर मुंबई

सिद्धिविनायक मंदिर हे मुंबई आणि महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय मंदिरांपैकी एक आहे. जर तुम्ही मुंबईतले रहिवासी असाल आणि तुम्हाला मुंबई बाहेर जायचे नसेल तर तुम्ही या मंदिरात आईला घेऊन जाऊ शकता. मदर्स डे ला रविवार असल्याकारणामुळे थोडीफार गर्दी या मंदिरात असू शकते, पण मंगळवारच्या तुलनेपेक्षा गर्दी कमी असेल.

कोल्हापूर

कोल्हापूर हे पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले धार्मिक शहर आहे. आईला तुम्ही महालक्ष्मी मंदिरापासून ज्योतिबा मंदिरापर्यंत अनेक धार्मिक ठिकाणी घेऊन जाऊ शकता. कोल्हापूरमध्ये अनेक विलक्षण मंदिरे आहेत ज्यांना मोठ्या संख्येने भाविक भेट देतात. कोल्हापुरातील मंदिरांना भेट देण्याव्यतिरिक्त, आपण शहरातील काही पर्यटन आकर्षणे देखील पाहू शकता.

इतकेच नव्हे तर महाराष्ट्रात तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट, जेजूरी, एकवीरा यांसारखे अनेक धार्मिक स्थळे आहेत, जिथे भाविक लाखोंची संख्येने भेट देतात. त्यामुळे यंदाच्या मदर्स डे विकेंडला तुम्ही तुमच्या आईला यांपैकी एका ठिकाणी घेऊन जाण्यास हरकत नाही.