अनेकजण आजही पोलीस पकडू नयेत म्हणून हेल्मेट घालतात. मात्र हेल्मेट सुरक्षेच्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे, हे पटवून देणारी एक घटना समोर आली आहे. गुजरातमधील सुरतमध्ये रविवारी एका बाईकचा अपघात झाला. अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर बाईकस्वाराने जर हेल्मेट घातलं नसतं तर काय झालं असतं? असा प्रश्न तुम्हाला देखील पडेल.
सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये दिसत आहे की, एक बाईकस्वार कारला ओव्हरटेक करतो आणि थेट रस्त्याच्या सुरक्षा भिंतीवर जाऊन आपटतो. सुदैवाने बाईक चालकाने हेल्मेट घातले होते.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ कारच्या डॅशकॅममध्ये रेकॉर्ड झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय त्यानुसार, घटना 8 ऑक्टोबर 2023 ची आहे. गुजरातमधील सुरत येथील रिंगरोड पुलावर हा अपघात झाला आहे.
व्हिडीओतील दृष्यांनंतर एक बाईक वेगाने एका कारला ओव्हरटेक करते. कारला ओव्हरटेक समोरच एक तीव्र एक वळण आहे. मात्र या वळणाचा अंदाज चालकाला आला नाही. त्यामुळे बाईक पूर्ण पूर्ण वळण्याऐवजी थेट सुरक्षा भिंतीला जाऊन धडकली. बाईक चालकही सुरक्षा भिंतीवर आपटला. मात्र काही क्षणात तो उभा राहिला. सुदैवाने त्याने हेल्मेट घातल्याने त्याचा जीव वाचला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.