अलीकडे सफाई कामगारांचा प्रश्न खूपच जोर धरलेला असतानाच अखेरीस हा प्रश्न सुटला आहे. अखेर परिपत्रकास मंजुरी मिळाली आहे. सध्या सरकारतर्फे अनेक योजना राबविल्या जातात जेणेकरून सामान्य नागरिकांना त्याचा पुरेपूर फायदा मिळेल. पण महापालिकेतील सफाई कामगारांच्या वारसा हक्काचा प्रश्न खूप दिवसांपासून प्रलंबित होता.
महापालिकेतील सफाई कामगारांच्या वारसा हक्काचा प्रलंबित प्रश्न अखेर सुटला आहे. लाड समितीच्या शिफारशीनुसार राज्य सरकारने सफाई कामगार कुटुंबांना वारसा हक्काने नियुक्ती देण्यास 24 फेब्रुवारी 2024 रोजी मंजुरी दिली व दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी परिपत्रकास मंजुरी मिळाली.
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार व माजी मंत्री प्रकाश आवाडे अण्णा, विद्यमान आमदार राहुल आवाडे साहेब व नगरसेवक श्रीरंग खवरे साहेब यांचे महाराष्ट्रातील व इचलकरंजी मधील समाजातील सर्वांकडून आभार मानण्यात येत आहे.