सध्या अनेक भागात विकासकामांचा शुभारंभ होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पहायला मिळत आहे. इचलकरंजी शहरात देखील अनेक विकासकामे सुरु आहेत. त्यामध्ये मग अतिक्रमण काढणे, रस्ता दुरुस्ती असेल यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. इचलकरंजी शहरातील आंबेडकरनगर, गणेशनगर परिसर हा जास्त लोकसंख्या असलेला भाग आहे. सदरच्या या बहुतांश भागांमध्ये महावितरणच्या विद्युत वाहिन्या घरावरून गेलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जीवितेस धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे गणेशनगर, आंबेडकरनगर प्रभागात पोलवरील चार विद्युत वाहिनी आहेत त्या खूप वर्षांपूर्वीच्या आहे त्याचबरोबर त्या खूप जास्त प्रमाणात जीर्ण झालेल्या आहेत. वादळी वाऱ्यामध्ये या विद्युत तारा एकमेकांजवळ आल्यानंतर शॉर्ट सर्किट होण्याची भीती देखील निर्माण होते.
यामुळे काही अनुचित प्रकार घडण्याआधी लवकरात लवकर सिंगल विद्युत वाहिनी टाकावे व ज्या घरावरून विद्युत वाहिन्या गेल्या आहेत त्या विद्युत वाहिन्या काढाव्या अशी बऱ्याच वर्षापासून माजी आमदार अशोकराव जांभळे यांनी निवेदनाद्वारे वारंवार महावितरण अधिकारी यांच्याकडे मागणी केली होती.
त्या अनुषंगाने गणेशनगर, आंबेडकरनगर परिसरातील काही भागांमध्ये कामाला सुरुवात झाली असून चार विद्युत वाहिनी असेल त्या ठिकाणी एक विद्युत वाहिनी, त्याचबरोबर ज्या घरावरून विद्युत वाहिनी गेली आहे. त्या घरावरील विद्युत वाहिनी काढून रस्त्यावर पोल टाकण्याच्या कामाचा शुभारंभ माजी आमदार अशोकराव जांभळे व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.