जुनी पेन्शन योजना लागू करण्याबरोबरच विविध मागण्यासंदर्भात हातकणंगले येथील सर्व सरकारी कार्यालयात काम बंद करण्यात आले. तहसील कार्यालय उघडले होते. पण कामकाज बंद होते. कार्यालयामध्ये दिवसभर सामसूम वातावरण होते.
कार्यालयातील सर्वच कर्मचारी कोल्हापूरला आंदोलनासाठी गेल्याचे सांगण्यात आले. दुय्यम निबंधक, सामाजिक वनीकरण विभाग, कृषी विभागासह उपनिबंधक सहकारी संस्था या कार्यालयांची कुलूपे सुद्धा काढलेले नव्हती.भूमी अभिलेख कार्यालय उघडले होते. मात्र कार्यालयात कोणीही नव्हते.
बाहेरील बाजूस बेमुदत संप असल्याने काल कार्यालयीन कामकाज बंद राहील असा फलक लावला होता. पंचायत समितीमध्ये अधिकारी व कर्मचान्यांनी काम बंद ठेवून ठिय्या आंदोलन केले. ‘एकच मिशन जुनी पेन्शन अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला तर अनेक कर्मचारी नेत्यांनी पेन्शन योजनेबाबत दिवसभर भाषणातून मते व्यक्त केली.
पंचायत समितीच्या आंदोलनामध्ये ग्रामसेवक संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष (डीएनई) बाबासाहेब कापसे, लिपीक वर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रविंद्र मुत्ते, विस्तार अधिकारी संघटनेचे अध्यक्ष एन. आर. रामाण्णा तालुका आरोग्य कर्मचारी संघटनेचे महेश वडर, अंगणवाडी पर्यवेक्षिका संघटनेच्या सुवर्णा मस्के, संतोष पवार, राजेद्र मगदूम, सुनिल खांडेकर, चंदन चव्हाण, जे. के. वसगडेकर, युनूस देसाई, शशिकांत कांबळे, अनुपमा सिदनाळे, पी. के. मुरमुरे, सलीम नदाफ, मनिषा दौडे, विद्यासागर माणकापुरे, राजेश पाटोळे, तात्यासो पाटील, विठ्ठल कांबळे, ए. आर. वीरकर, सुजाता कांबळे, व्ही. एस. कुलकर्णी यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी व संघटना पदाधिकारी उपस्थित होते.