आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचे बजेट सादर करणार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज देशाचे बजेट सादर करणार आहेआज (1 फेब्रुवारी )केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचे बजेट अर्थात अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी 3.0 सरकारच्या या बजेटकडे उद्योजक, व्यावसायिकांपासून ते सर्वसामान्यापर्यंत सर्वांचे लक्ष लागले आहे.

काल ( शुक्रवार 31 जानेवारी) पासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं असून आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचे बजेट अर्थात अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी 3.0 सरकारच्या या बजेटकडे उद्योजक, व्यावसायिकांपासून ते सर्वसामान्यापर्यंत सर्वांचे लक्ष लागले आहे. निर्मला सीतारमण या आज सकाळी सकाळी 11 वाजता देशाचे बजेट सादर करतील. केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये काय घोषणा होणार, काय स्वस्त झाले, काय महाग झाले. कोणता कर कमी झाला, कोणता कर वाढला याबाबतीत सर्व काही प्रश्नाची उत्तरे मिळतील.