भारतात तेल कंपन्यांकडून व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती ठरवल्या जातात. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल होतात. यामुळं CNG आणि PNG च्या किंमतीदेखील ठरवल्या जातात. आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. मात्र त्यापूर्वीच सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज 1 फेब्रुवारी रोजी सकाळीच सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा सिलेंडरच्या दरात घट केली आहे.
तर, OMCs ने विमान इंधनाच्या दरातदेखील वाढ केली आहे. यामुळं विमानप्रवास महाग होऊ शकतो. देशात LPG सिलेंडर आणि ATF च्या नव्या किंमती आज म्हणजेच 1 फेब्रुवारी पासून लागू होणार आहेत. आज व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत घट झाली असून दरांत 7 रुपयांची घट झाली आहे. या नव्या किंमती शनिवार 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. मात्र घरगुती गॅस दरांत कोणतेही बदल झालेले नाहीत.