Valentine Day 2025 Week: यंदाचा ‘व्हॅलेंटाईन वीक’ खास! कोणत्या दिवशी काय कराल? संपूर्ण यादी…..

फेब्रुवारी महिना सुरू होताच प्रेमीयुगुलांना वेध लागतात ते म्हणजे व्हॅलेंटाईन वीकचे.. फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना समजला जातो. प्रेमी युगुल या महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. एकमेकांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी जोडपे व्हॅलेंटाईन वीक निवडतात. अशात, जर तुम्ही देखील कोणाकडे तरी प्रेम व्यक्त करण्यासाठी आतुर असाल, तर तुमच्यासाठीही व्हॅलेंटाइन वीक ही योग्य संधी आहे. येथे आम्ही तुमच्यासाठी व्हॅलेंटाईन वीकची यादी घेऊन आलो आहोत. हे पाहून तुम्ही त्याची तयारी करू शकता. जाणून घेऊया व्हॅलेंटाईन वीकमध्ये कोणत्या दिवशी काय करावे?

7 फेब्रुवारी- रोज डे (Rose Day )

7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाइन वीक सुरू होणार आहे. या दिवशी रोझ डे साजरा केला जातो. या दिवशी तुम्ही अशा व्यक्तीला गुलाब देऊ शकता. ज्यांच्यासाठी तुमच्या हृदयात अपार प्रेम आहे.

8 फेब्रुवारी- प्रपोज डे (Propose Day )

व्हॅलेंटाईन वीकच्या दुसऱ्या दिवशी प्रपोज डे साजरा केला जातो. प्रपोजलच्या दिवशी तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी ज्या व्यक्तीसोबत तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत आहात त्या व्यक्तीला तुमचे प्रेम व्यक्त करा.

9 फेब्रुवारी- चॉकलेट डे (Chocolate Day )

व्हॅलेंटाईन वीकच्या तिसऱ्या दिवशी चॉकलेट डे साजरा केला जातो. या दिवशी तुमच्या प्रेमाला चॉकलेट भेट देऊन तुमच्या प्रेमाच्या नात्यात गोडवा वाढवा.

10 फेब्रुवारी- टेडी डे (Teddy Day )

व्हॅलेंटाईन वीकचा चौथा दिवस महिलांसाठी खूप खास असतो. कारण या दिवशी टेडी डे साजरा केला जातो. या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला एक सुंदर टेडी भेट देऊ शकता.

11 फेब्रुवारी- प्रॉमिस डे (Promise Day )

व्हॅलेंटाईन वीकच्या पाचव्या दिवशी प्रॉमिस डे साजरा केला जातो. या दिवशी, आपले नाते अतूट करण्यासाठी एकमेकांना वचन द्या.

12 फेब्रुवारी- हग डे (Hud Day )

व्हॅलेंटाईन वीकच्या सहाव्या दिवशी हग डे साजरा केला जातो. या दिवशी तुमच्या जोडीदाराला मिठी मारून तुमचे प्रेम व्यक्त करू शकता

13 फेब्रुवारी- किस डे ( Kiss Day )

व्हॅलेंटाईन वीकच्या सातव्या दिवशी किस डे साजरा केला जातो. या दिवशी तुमच्या जोडीदाराचे चुंबन घ्या आणि तुमच्या भावना त्याच्या/तिच्यासमोर व्यक्त करा आणि त्याला/तिला खास वाटू द्या.

14 फेब्रुवारी- व्हॅलेंटाईन डे ( Valentines Day )

व्हॅलेंटाईन वीकचा सर्वात खास आणि शेवटचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. 14 फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे. हा दिवस खास बनवण्यासाठी आत्तापासून तयारी सुरू करा. या दिवशी तुम्ही कुठेतरी डेटला जाऊ शकता. एकमेकांसाठी सरप्राईज प्लॅन करू शकतात.