राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इस्लामपूर येथे बी.टेक. चे शिक्षण घेणारी कु. विश्वसम्राज्ञी रामराजे माने हिने राष्ट्रीय विज्ञान मेळाव्यात प्रथम क्रमांक मिळवून संशोधन स्तरावर चमक दाखवली आहे. माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांनी सत्कार करून अभिनंदन केले. दिल्ली येथील युवा व कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने विकसित भारत व राष्ट्रीय विज्ञान मेळावा आयोजित केला होता. राष्ट्रीय विज्ञान मेळाव्यात महाराष्ट्रातून विश्वसम्राज्ञी माने हिने सहभाग घेतला होता. विश्वसम्राज्ञी माने हिने गरिबांचा व्हेंटिलेटर हे उपकरण बनविले आहे.
या उपकरणाच्या माध्यमातून तिने सांगली जिल्हा, कोल्हापूर विभागातून प्रथम व नांदेड येथील युवा महोत्सवातून तिची महाराष्ट्र राज्य विकसित भारत व राष्ट्रीय महोत्सवाच्या प्रतिनिधी म्हणून निवड झाली होती. वतीने १० ते १२ जानेवारी रोजी नवी दिल्ली मध्ये भारत मंडपम येथे तीन विज्ञान मेळावा आयोजित केला होता. दिवसाचे विकसित भारत व राष्ट्रीय यामध्ये तिचा देशात प्रथम क्रमांक आला. या यशामुळे तिला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आयोजित चर्चा व भोजनाला सहभागी होता आले. युवा व कल्याण मंत्रालय भारत सरकारचे कॅबिनेट मंत्री मनसुख मंडवीया यांनी राष्ट्रीय विज्ञान मेळाव्यात तिने तयार केलेल्या उपकरणाची सविस्तर माहिती घेतली.
विश्वसम्राज्ञीला आरआयटीचे डायरेक्टर डॉ. पी.व्ही. कडोले, डॉ.ए.बी. काकडे, यशोधन पाटील, सौरभ जौंजाळ व नेत्रा फाउंडेशनचे सीईओ हर्षल पाटील यांचे सहकार्य लाभले. ग्रामीण भागातून आलेल्या या तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मुलीला मिळालेल्या उत्तुंग यशाबद्दल