उरूण परिसरातील संत ज्ञानू बाबाजी पाटील मंडपामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सुरुवात झाल्याची माहिती मंडपाचे अध्यक्ष ह. भ. प. दादासाहेब पाटील यांनी दिली. हे पारायण ४ जूनपर्यंत चालणार आहे. दत्तात्रय फसाले, विवेकानंद पाटील, पांडुरंग पाटील, रामचंद्र पवार, सुरेश कदम, प्रमोद पाटील, महेश सुतार, बापूसाहेब सांबारे यांची प्रवचने होतील.
दिगंबर यादव, बाळासाहेब कदम, बाळकृष्ण मुळे, ईश्वर सुतार, हरिभाऊ कदम, भानुदास कोल्हापूरे, सुनील पाटील यांची कीर्तने होणार आहेत. ४ जूनला सुनील पाटील यांच्या काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने सांगता होईल दैनंदिन काकडा, अभिषेक, महापूजा, वाचन प्रवचन, कीर्तन होणार आहे.