प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता केंद्र सरकारकडून फेब्रुवारी 2025 च्या अखेरीस पात्र लाभार्थ्यांना खात्यात पाठवण्यात येणार आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता वितरित केला जाईल. पंतप्रधान 24 फेब्रुवारी रोजी कृषी कार्यक्रमांनिमित्त बिहार दौऱ्यावर असणार आहेत.
त्याचदिवशी, पंतप्रधान शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता पाठवतील. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑक्टोबर 2024 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 18व्या हप्त्याचे पैसे पाठवले होते.