अभिषेक शर्मा याने रविवारी 2 फेब्रुवारीला मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये इंग्लंडविरुद्ध पाचव्या आणि अंतिम टी 20i सामन्यात इतिहास घडवला. अभिषेकने 135 धावांची विस्फोटक शतकी खेळीसह रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांचा रेकॉर्ड ब्रेक केला.अभिषेकने वानखेडे स्टेडियममध्ये इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. अभिषेकने अवघ्या 54 चेंडूंमध्ये 135 धावा केल्या. अभिषेकच्या या खेळीत 13 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता.अभिषेकने या खेळी दरम्यान अवघ्या 37 चेंडूत शतक झळकावलं.
अभिषेक यासह टी 20i क्रिकेटमध्ये वेगवान शतक करणारा टीम इंडियाचा दुसरा फलंदाज ठरला. टीम इंडियाकडून वेगवान शतकांचा विक्रम हा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्या नावावर आहे. रोहितने 35 बॉलमध्ये वेगवान शतक केलं होतं. अभिषेकने 135 धावांच्या खेळीसह शुबमन गिल याचा महारेकॉर्ड उद्धवस्त केला. टीम इंडियासाठी टी 20i मध्ये एका सामन्यात सर्वाधिक 126 धावांचा विक्रम शुबमन गिलच्या नावावर होता.
मात्र हा विक्रम आता शुबमनच्या नावावर झाला आहे.अभिषेकने शुबमन गिलसह रोहित शर्माला मोठा झटका दिला. अभिषेकने रोहित शर्माचा एका टी 20i सामन्यात टीम इंडियासाठी सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडीत काढला. रोहितने 22 डिसेंबर 2017 रोजी श्रीलंकेविरुद्ध 10 सिक्स खेचले होते. तर अभिषेकने 13 सिक्ससह हा रेकॉर्ड ब्रेक केला. तसेच अभिषेक शर्मा याचं हे टी 20i कारदीकीर्दीतील दुसरं शतक ठरलं.
टीम इंडियासाठी सर्वाधिक शतकांचा विक्रम हा कॅप्टन रोहित शर्मा याच्या नावावर आहे. अभिषेकने इंग्लंडविरुद्ध या सामन्यात 250.00 च्या स्ट्राईक रेटने 135 धावांची ही खेळी साकारली. इतकंच नाही तर 2 विकेट्सही घेतल्या. अभिषेकला त्यासाठी ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आलं.