Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार, मातोश्रीवर खलबतं

मध्यंतरीच्या काळात ठाकरे गटाचे खासदार हे शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.त्यानंतर ठाकरेंच्या खासदारांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन आम्ही सर्व उद्धव ठाकरेंसोबत आहोत याचा पुरावा दिला होता. परंतु या पत्रकार परिषदेत ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे अनुपस्थित होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेल्या महादजी शिंदे पुरस्कार सोहळ्यात संजय दिना पाटील यांनी उपस्थिती लावल्याचे फोटो झळकले. त्यानंतर सर्वांच्याच राजकीय भुवया उंचवल्या .

याच अनुषंगाने ठाकरे गटाची मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावली होती.ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांनी काल मोठे शक्तिप्रदर्शन करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेते प्रवेश केला. आज रत्नागिरीत देखील ऑपरेशन टायगर झाल्याचे पाहायला मिळाले. एकूणच उबाठा पक्षाला मोठी खिंडार पडली आहे.

ठाकरेंचे कोकणातले महत्वाचे नेते भास्कर जाधव हे देखील नाराज असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहे. या कारणामुळे आज मातोश्रीवर विनायक राऊत, अनिल परब आणि संजय राऊत यांच्यासह मातोश्रीवर महत्वाची बैठक झाली. आता या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? या बैठकीमुळे पक्षाला लागलेली गळती थांबणार का हे बघणे महत्वाचे ठरेल.