मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ‘योजनेअंतर्गत पात्र महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता केव्हा वितरित केला जाईल, याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.या योजनेच्या 2 कोटी 59 लाख महिला लाभार्थी आहेत. त्यांना दरमहा 3 हजार 885 कोटी रुपये लागतात. अशातच नवीन अपडेट समोर आली आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासोबतच संजय गांधी निराधार योजना, नमो शक्ती योजना व स्वत:हून लाभ नाकारणाऱ्या लाभार्थीं महिलांची संख्या 5 लाख 40 हजारांपर्यंत झाली आहे. सध्या ज्या लाभार्थी महिलांच्या नावे चारचाकी आहेत, त्याची पडताळणी सुरु आहे. त्यामुळे पडताळणी पूर्ण होईपर्यंत लाडक्या बहिणींना लाभ मिळणार नाही, अशी वस्तुस्थिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या लाभार्थी महिलांच्या नावे चारचाकी वाहने आहेत, त्यांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरु आहे. त्यासाठी आणखी आठ-दहा दिवस लागतील. त्यानंतर त्याचा अहवाल शासनाला पाठविला जाईल आणि शासन स्तरावरून त्यासंदर्भातील निर्णय होईल. त्यामुळे लाडक्या बहिणींना पुढील महिन्यात फेब्रुवारीचा हप्ता मिळेल असे दिसत आहे.