आमदार जयंतराव पाटील यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी अनेक भागात साजरा करण्यात आला. इस्लामपूर येथे आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राजारामनगर येथील आविष्कार कल्चरल ग्रुपचा २३वा संगीत महोत्सव शुक्रवारी (दि. २१) व शनिवारी (दि. २२) सायंकाळी ७ वाजता इस्लामपूर येथील विद्यामंदिर हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित केलेला आहे.
दि. २१ रोजी संपूर्ण महाराष्ट्राला लोटपोट हसविणारी मनोरंजनाची हास्ययात्रा, तर दि. २२ रोजी कोमल कृष्णा प्रस्तुत सितारोंकी मैफल हा हिंदी-मराठी गीतांचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती आविष्कारचे अध्यक्ष प्रा. कृष्णा मंडले यांनी दिली. आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमांचा शक्रवारी व शनिवारी जास्त जास्त रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आलेले आहे.