आम. जयंत पाटील पक्षप्रवेशामुळे धाकधूक, होणार करेक्ट कार्यक्रम?

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे बदलतानाचे चित्र सर्वानाच पहायला मिळाले. सध्या राजकीय बाबतीत अनेक चर्चाना उधाण आलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचा पक्षप्रवेश भारतीय जनता पार्टीत होईल आणि त्यानंतर आपल्याला मिळणारी मंत्रीपदे आणि राजकीय वर्चस्वाला धक्का बसेल या भयापोटी सध्या आणि भाजप आणि शिवसेनेत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आम. जयंत पाटील यांनी आपण पक्ष सोडणार असे म्हटले नाही आणि ते पक्ष सोडतील अशा आशयाच्या येणाऱ्या बातमीवर त्यांनी प्रतिकारही केलेला नाही. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आम. पाटील यांचे कौतुकही थांबवलेले नाही, शिवाय जिल्ह्याला पालकमंत्री देताना भाजप- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सेनेच्या स्थानिक आमदाराला संधी दिली नाही.

याचबरोबर आम. जयंत  पाटील यांच्यावर तोंडसुख घेणाऱ्या भाजपमधील नेत्यांनीही तोंड उघडणे बंद केले आहे. कधीही साहेबांचा प्रवेश होईल आणि पक्षात आल्यानंतर ते करेक्ट कार्यक्रम करतील, ही धाकधूक बाकी सध्या सांगली जिल्ह्यातील सरकार पक्षात आहे आणि याचमुळे शुक्रवारी गोड्या जेवणातही खारी चर्चा होती.