विधानसभेचं अधिवेशन झाल्यावर खातेवाटप होणार आहे. मला वाटत नाही, लवकर खातेवाटप होईल. बहुमत मिळाल्यानं खातेवाटपात ओढाताण सुरू आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.ते नागपूर विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
प्रत्येक अधिवेशनात तुमचा आक्रमकपणा पाहिलेला आहे. दोन दिवस राहिले आहेत. तुमचा आक्रमकपणा दिसणार आहे का? असा प्रश्न विचारल्यावर जयंत पाटील यांनी म्हटलं, कसंय की, आता गटनेते म्हणून जितेंद्र आव्हाड आहेत. रोहित पाटील आणि इतर सदस्यांना संधी देण्याचं आमचं धोरण आहे.