महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्र SSC वेळापत्रक 2025 सादर केले आहे. इयत्ता दहावीचे विद्यार्थी MSBSHSE या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच https://www.mahahsscboard.in/ वर परीक्षेचे वेळापत्रक पाहू शकतात. दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक कसे पाहावे किंवा या वेळापत्रकाची PDF कशी डाउनलोड करावी, याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र बोर्डाने २०२५ साठी एसएससी (इयत्ता 10) परीक्षेचे वेळापत्रक सादर केले आहे. विद्यार्थी हे वेळापत्रक अधिकृत वेबसाइट www.mahahsscboard.in वरून PDF स्वरूपात डाउनलोड करू शकतात. या परीक्षेच्या तारखा तपासून विद्यार्थी अभ्यासाची तयारी सुरू करू शकतात. वेळापत्रक डाउनलोड करून कोणत्याही नवीन नोटिफिकेशनबाबत अपडेटेड राहणे आवश्यक आहे. परीक्षेचे वेळापत्रक मिळवण्यासाठी वेबसाइटला भेट द्या आणि महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेसाठी अभ्यासाचे चांगले नियोजन करा.
यंदा शैक्षणिक सत्र २०२४-२५ च्या दहावी परीक्षेमध्ये सुमारे १३ लाख विद्यार्थी परीक्षा हॉलमध्ये बसतील अशी अपेक्षा आहे. या सर्व विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र बोर्डाने इयत्ता १० वी चे टाइम टेबल अधिकृत वेबसाइटवर दिलेले आहे. २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ दरम्यान ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षा सकाळी ११ ते दुपारी २ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ या दोन शिफ्टमध्ये घेतल्या जातील.

महाराष्ट्र बोर्ड SSC टाइम टेबल २०२५ डाउनलोड करण्यासाठी स्टेप्स
स्टेप १ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) https://www.mahahsscboard.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
स्टेप २ : नवीन नोटिफीकेशन जाणून घेण्यासाठी होम पेज खाली स्क्रोल करा
स्टेप ३ : त्यानंतर महाराष्ट्र बोर्ड SSC टाइम टेबल २०२५ या लिंकवर क्लिक करा.
स्टेप ४ : महाराष्ट्र बोर्ड SSC टाइम टेबल २०२५ स्क्रीनवर दिसेल.
स्टेप ५ : वेळापत्रक तपासा आणि डाउनलोड करा.