अनेक भागातील नद्या खूपच प्रदूषित झालेल्या आहेत. तसेच नद्यांमध्ये गाळ साचल्याने देखील पाणी प्रदूषण होत राहते. माण नदीपत्रात खड्ड्यामधील मासे पकडत असताना गाळाचा अंदाज न आल्याने मेथवडे येथील मासेमारी करणारे भाऊसाहेब जाधव वय ६८ हे गाळात व माशाच्या जाळ्यात अडकून मरण पावले आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, माण नदीपात्रात अवैद्य वाळू व्यवसायामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ येऊन साचला आहे सध्या माणनदीपात्रामधील पाणी कमी झाले आहे व ते खड्ड्यात साचलेल्या पाण्यात मासे पकडण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात.
माण नदीपात्रात मेथवडे बंधाऱ्या जवळ खड्ड्यामध्ये भाऊसाहेब दामोदर जाधव हे रविवार २३ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजण्याच्या पूर्वी मासे पकडण्यासाठी गेले होते खड्ड्यातील गाळ किती आहे याचा अंदाज न आल्याने व माशाच्या जाळ्यात अडकल्याने ते त्या गाळात अडकले त्यांना ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे आणले असता डॉक्टर अवताडे यांनी मरण पावले असल्याचे सांगितले व त्यांनी सांगोला पोलीस ठाणे येथे बंधाऱ्यात चिखलात अडकून मयत झाल्याचे खबर दिली आहे. याबाबत सांगोला पोलीस पुढील तपास करीत आहे.