शासनातर्फे अनेक नवनवीन योजना राबविल्या जातात. ज्यांचा नागरिकांना पुरेपूर लाभ देखील होत असतो. सध्या घरकुल योजना खूपच नावारूपास येत आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ मधील घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र व प्रथम हप्ता वितरण शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुणे येथे ऑनलाइन करण्यात आले. यावेळी हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे ग्रामपंचायत हेरले यांच्या वतीने मराठी शाळा येथे ऑनलाईन प्रक्षेपण दाखवण्यात आले.
यावेळी लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण माजी सभापती जिल्हा परिषद यांच्या हस्ते ७० लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच राहुल शेटे, उपसरपंच निलोफर खतीब, ग्रामपंचायत सदस्य बक्तीयार जमादार, मनोज पाटील, राकेश जाधव, उर्मिला कुरणे, सविता पाटील, शुभांगी चौगुले, सुशीला परमाज, रंजना माने, ग्रामपंचायत अधिकारी बी. एस. कांबळे उपस्थित होते.