सांगोला विद्यामंदिरात वार्षिक स्नेहसंमेलनास उद्यापासून प्रारंभ!

सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल, विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय, पूर्व प्राथमिक विद्यालय व बालक मंदिर, सांगोला यांचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ बुधवार दि. २०/१२/२०२३ ते शनिवार दि. २३/ १२/२०२३ या कालावधीत संपन्न होणार आहे. यामध्ये दि. २०/१२/२०२३रोजी सकाळी ८- ३०वा. विज्ञान प्रदर्शन, कला प्रदर्शन, फनीगेम व फुडस्टॉल उद्घाटन समारंभ होईल.

या कार्यक्रमाचे उद्घाटन सांगोल्याचे तहसीलदार श्री. संतोष कणसे, सांगोला पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री. अनंत कुलकर्णी व इनरव्हील क्लब, सांगोला अध्यक्षा सौ.सविता लाटणे यांच्या शुभहस्ते होईल तर हा कार्यक्रम सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार श्री.शं.बा.सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

२१/१२/२०२३ रोजी सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय, पूर्व प्राथमिक विद्यालय व बालक मंदिर, सांगोला यांचा विविध गुणदर्शन तर दि.२२/१२/२०२३ रोजी सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम होईल.

दि. २३/१२/२०२३ रोजी १०वा. पारितोषिक वितरण समारंभ होईल. हे पारितोषिक वितरण श्री. सोमनाथ गायकवाड पोस्ट मास्तर, सांगोला यांच्या शुभहस्ते होईल तसेच या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थाध्यक्ष श्री.प्रबुध्दचंद्र झपके सर हे उपस्थित राहणार आहेत. तर या कार्यक्रमासाठी संस्थासचिव श्री.म.शं. घोंगडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

तरी वरील सर्व कार्यक्रमास अगत्यपूर्वक उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका कु. सरिता कापसे, मराठी माध्यमाचे प्र. मुख्याध्यापक श्री. उदय बोत्रे, पूर्व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. रोहिणी महारनवर, बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. सविता देशमाने तसेच इंग्रजी माध्यमाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. अजित मोरे, मराठी माध्यमाचे विभाग प्रमुख श्री. चेतन कोवाळे त्याचबरोबर इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी प्रतिनिधी कु. अमेय मनोजकुमार वलेकर, विद्यार्थीनी प्रतिनिधी कु. वैष्णवी विनोद खंदारे व मराठी माध्यमातील विद्यार्थी प्रतिनिधी कु. विराज हेमंतकुमार टेळे, विद्यार्थीनी प्रतिनिधी कु. श्रावणी दिलीप लवांडे यांनी केले आहे.