जेव्हा विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवतात, तेव्हा साहजिकच कोणत्याही व्यक्तीच्या घरात खूप आनंददायी वातावरण असते. कुटुंबातील सर्व सदस्य भविष्यासाठी वेगवेगळ्या संधी शोधत असतात जसे की कोणता कोर्स सर्वोत्तम आहे, कोणते कॉलेज सर्वोत्तम आहे, कोणता अभ्यास अधिक चांगल्या संधी देतो इत्यादी. परंतु केवळ आपले पालक त्यापेक्षाही पुढचा विचार करतात आणि पैशाचं नियोजन करतात जे सहसा विद्यार्थ्यांना त्यावेळी माहिती नसते.
त्यामुळे विदयार्थी आणि पालकांनी शैक्षणिक कर्जाची प्रक्रिया समजून घेतली पाहिजे आणि त्यासाठीच आम्ही आपल्यासाठी Education Loan Process या लेखात सांगणार आहे .या लेखात तुम्हाला वाचायला मिळेल शैक्षणिक कर्जासाठी अर्ज कसा करायचा? संपूर्ण प्रक्रिया आणि शैक्षणिक कर्जाविषयी सर्व काही…..
शैक्षणिक कर्जासाठी पात्रता
- विद्यार्थी भारतीय नागरिक असावा.
- विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेद्वारे किंवा निवडीच्या इतर कोणत्याही प्रक्रियेद्वारे गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश मिळवलेला असावा.
- संस्था आणि अभ्यासक्रम राज्य किंवा केंद्र सरकारने मंजूर केलेला असावा.
- शैक्षणिक कर्जासाठी किमान गुण खालीलप्रमाणे आहेत, General (60%), OBC (55%), SC/ST (50%)
- शैक्षणिक कर्जासाठी वय हा महत्त्वाचा निकष नाही, जरी विद्यार्थ्याचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असले तरी त्याचे/तिचे पालक त्यांना या कर्जामध्ये सह-अर्जदार म्हणून सामील करू शकतात आणि पालक विद्यार्थ्याच्या वतीने कागदपत्रांवर सह्या करू शकतात. 18 वर्ष पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांनी कर्जाच्या नवीन कागदपत्रांवर स्वाक्षरी केली पाहिजे.
- मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश झाला असेल तरीही कर्ज मंजूर केले जाऊ शकते. मात्र, केवळ शासनमान्य शैक्षणिक शुल्क मंजूर केली जाते.
शैक्षणिक कर्जासाठी पात्र असलेले अभ्यासक्रम
- बारावीच्या नंतर असलेले सर्व अभ्यासक्रम शैक्षणिक कर्जासाठी पात्र आहेत.
- तसेच काही पदविका अभ्यासक्रमासाठी दहावी हि पात्रता असेल तरीही कर्ज मंजूर होऊ शकते.
- बँका कौशल्य विकास अभ्यासक्रमांना सुध्दा वित्तपुरवठा करतात.
- केंद्र सरकार/राज्य सरकार/AICTE/ICMR द्वारे मंजूर केलेले अभ्यासक्रम
- मान्यताप्राप्त विद्यापीठांशी संलग्न अभ्यासक्रम.
- वैमानिक, पायलट प्रशिक्षण, शिपिंग.
शैक्षणिक कर्जामध्ये कोणते खर्च समाविष्ट
- ट्यूशन फी (Tuition Fees)
- वसतिगृह शुल्क (Hostel Fees)
- मेस चार्जेस (Mess Charges)
- परीक्षा शुल्क (Exam Fees))
- लायब्ररी शुल्क
- प्रयोगशाळा शुल्क
- पुस्तके आणि स्टेशनरी (Books and Stationary)
- कोर्ससाठी आवश्यक असल्यास लॅपटॉप (Laptop)
- सुरक्षा ठेव
- अभ्यासक्रमासाठी लागणारी उपकरणे (Educational Equipments)
- अभ्यास दौऱ्याचा खर्च (Study Tour)
अतिरिक्त खर्च:
- अ) विद्यार्थ्याचा विमा हप्ता
- ब) वसतिगृहाची सुविधा उपलब्ध नसल्यास विद्यार्थी स्वतंत्रपणे निवासाचा पर्याय निवडू शकतात परंतु या निवासाचा खर्च वाजवी असावा.
किती शैक्षणिक कर्ज मिळू शकेल?
आपल्याला 4 लाखांपर्यंतच्या शैक्षणिक कर्जासाठी 100% कर्ज मिळू शकते आणि 4 लाखांपेक्षा जास्त रकमेवर तुम्हाला 95% पर्यंत कर्ज मिळू शकते, 5% मार्जिन मनी तुम्हाला स्वतःला भरावा लागेल. शैक्षणिक कर्जासाठी कोणतीही कमीतकमी किंवा जास्तीत जास्त अशी मर्यादा निर्दिष्ट केलेली नाही परंतु सर्व खर्च वाजवी असावेत. मार्जिन रक्कम आपल्याला चारही वर्षाची एकदाच भरावी असे नसते तर ज्या त्या वर्षी फी च्या प्रमाणात त्या त्या वर्षीची मार्जिन रक्कम भरावयाची असते.
शैक्षणिक कर्जासाठी कोण सह-अर्जदार
- आई-वडीलांपैकी एक शैक्षणिक कर्जामध्ये सह-अर्जदार म्हणून असावा.
- आई-वडील दोघेही हयात नसतील तर जवळचा नातेवाईक सह-अर्जदार म्हणून सामील होऊ शकतो.
- विवाहित व्यक्तीच्या बाबतीत, जोडीदाराने सह-अर्जदार म्हणून सामील होणे आवश्यक आहे.
व्याजदर
- अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत साधे व्याज आकारले जाते.
- अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर चक्रवाढ व्याजदर आकारला जातो.
- आपल्या इच्छेनुसार आपण अभ्यासक्रम सुरू असताना व्याज भरू शकता.
- परतफेडीसाठी EMI निश्चित करताना अभ्यासक्रम कालावधी दरम्यान जमा झालेले व्याज मूळ रकमेत जोडले जाईल व त्यावर EMI कॅल्क्युलेशन केले जाईल.
7.50 लाखांपेक्षा जास्त कर्जासाठी बँका तुमच्या शैक्षणिक कर्जासाठी मालमत्ता तारण मागतात. शैक्षणिक कर्जासाठी बँका खालीलप्रमाणे मालमत्ता तारणसाठी मागणी करतात: