चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा आता रंगतदार झाली आहे. काल दुबईत भरात वि. न्युझीलंड सामना पार पडला. रोमहर्षक अशा सामन्यात भारताने उत्तम खएळ करून न्युझीलंडला 44 धावांनी हरवत सेमीफायनलमध्ये धडक मारली. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 50 षटकांत 9 गडी गमावून 249 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडचा संघ 205 धावांवर गारद झाला. खरे तर किवींच्या डावाच्या सुरुवातीपासूनच केन विल्यमसन हा उत्तम खेळ करत भारत आणि विजय यांच्यामध्ये ठाम उभा ठाकला होता. पण अक्षर पटेलने त्याच्या ओव्हरमधील शेवटच्या चेंडूवर केन विल्यमसनला बाद केला. अक्षर पटेलने टाकलेल्या चेंडूवर विकेटकीपर केएल राहुलने केन विल्यमसनला स्टंप( यष्टिचित) केलं. भारताविरुद्ध फलंदाजी करताना विल्यमसनने 81 धावांची चांगली खेळी केली.
कोहलीने अक्षर पटलचे पाय धरले
त्याच्या खेळीमुळे न्युझीलंड हा सामना जिंकतो की काय असे वाटत होते, एकीकडे त्यांचे फलंदाज पटापट तंबूत परत जात होते, पण विल्यमसन हा टिकून होताच. अखेर अक्षर पटलने विल्यमसनला बाद केलं. त्यानंतर स्टेडिअममध्ये एक वेगळाच, सगळ्यांच्या लक्षात राहील असा नजारा दिसला. खरंतर विल्यमसनची विकेट मिळताच विराट कोहलीने पुढे जाऊन अक्षर पटेलचे पाय धरले, तो त्याच्या पाया पडत होता. अशा पद्धतीने त्याने पुढे जाऊन अक्षर पटेलचे अभिनंदन केलं. त्याचा हा अंदाज पाहून सगळेच अवाक झाले, अक्षर पटेललाही हसू फुटलं. कोहली आणि पटेलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्यावर नेटीझन्सनीही कमेंट करून भन्नाट प्रतिक्रिया दिल्यात.
भारताचा न्यूझीलंडवर सहज विजय
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या कालच्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 9 गडी गमावून 249 धावा केल्या. भारताकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक 79 धावा केल्या. हार्दिक पांड्याने 45 धावांची खेळी केली. तर अष्टपैलू अक्षर पटेलने 42 धावांचे योगदान दिले. तर प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव 45.3 षटकांत 205 धावांवर आटोपला. त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने हा सामना 44 धावांनी जिंकला. भारताकडून फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक 5 बळी घेतले. वरुण चक्रवर्तीने 10 षटकांत 42 धावांत 5 फलंदाज बाद केले. कुलदीप यादवला 2 यश मिळाले. तर हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांनी 1-1 विकेट घेतली.