विकी कौशलचं कौतुक करत कतरिना कैफ म्हणते, ‘माझ्या नवऱ्याशिवाय मला…’

अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. सांगायचं झालं तर, विकी कौशल सध्या ‘छावा’ सिनेमामुळे तुफान चर्चेत आहे. ‘छावा’ सिनेमात अभिनेत्याने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. सिनेमाने फक्त भरतात नाही तर, संपूर्ण जगभरात नवे विक्रम रचले आहेत. संपूर्ण जग विकीचं कौतुक करत असताना अभिनेत्री कतरिना हिने देखील नवऱ्याचं कौतुक केलं आहे. शिवाय स्वतःचं मन शांत ठेवण्यासाठी अभिनेत्री काय करते… याचा देखील खुलासा केला आहे.

एका मुलाखतीत कतरिना म्हणाली होती, ‘जेव्हा फिट असते तेव्हाच मला मेंटली चांगलं आणि प्रसन्न वाटतं… फिट राहण्यासाठी मी कायम योगा आणि कार्डियो करत असते. कारण मला माहिती योगा आणि कार्डिओ शिवाय मला कोणीच आनंदी ठेवू शकणार नाही… माझ्या नवऱ्याशिवया देखील मला कोणी आनंदी ठेवू शकणार नाही.’ ‘विकी कधी – कधी असं काही करतो, ज्यामुळे मला प्रचंड हसायला येतं. माझ्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो. विकी माझ्यावर प्रचंड प्रेम करतो. कायम माझं कौतुक करत असतो.’ सांगायचं झालं तर, लग्ना आधी विकी आणि कतरिना यांनी त्यांच्या नात्याबद्दल कोणाला कळू देखील दिलं नाही.

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 9 डिसेंबर 2021 मध्ये विकी आणि कतरिना यांनी लग्न करण्याचा निर्यण घेतला. शाही थाटात विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. आजही विकी आणि कतरिना यांना त्यांच्या डेटिंग लाईफबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात येतात.

‘छावा’ फेम विकी कौशल

अभिनेता विकी कौशल याने ‘छावा’ सिनेमात दमदार भूमिका बजावली आहे. ज्यामुळे अभिनेत्याच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली आहे. बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमाने दमदार कमाई केली आहे. सगल तीन आठवडे सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे.