दिलजीत दोसांझने पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरसोबत ‘ सरदार जी 3 ‘ मध्ये काम केल्यामुळं त्याला भारतात टीकेला सामोरं जावं लागल. कंगना रणौत (.Kangana Ranaut) हिनं आता या वादावर भाष्य करताना देशातल्या काही मोठ्या व्यक्तींमध्ये एकजूट, राष्ट्रीय भावनेचा अभाव असल्याचं तिनं म्हटलं आहे.कलाकारांनी आणि खेळाडूंनी सैनिक आणि राजकारण्यांसारखी राष्ट्रवादी जबाबदारी का निभावू नये, असा सवाल कंगनानं देखील केला आहे.
‘सरदार जी 3’ हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला नसला तरी, परदेशात तो प्रदर्शित झाला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संबंधांमुळं दिलजीत दोसांझ याला पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत काम केल्यामुळं लोकांकडून नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या. कंगनाला वाटतं की पब्लिक फिगर्समध्ये एकजूट राष्ट्रीय भावनेचा अभाव आहे.मी या लोकांबद्दल बरंच काही बोलले आहे. संभाषणाच्या सुरुवातीलाच मी म्हटलं होतं की, आपल्यात राष्ट्र निर्माणची भावना असायला हवी – प्रत्येकजण यात भागीदार व्हायला हवा.
आपल्यामध्ये अशी भावना का नाही? दिलजीत स्वतःचा मार्ग का निवडत आहे? इतर कोणत्याही क्रिकेटपटूचा स्वतःचा मार्ग का असावा? एका सैनिकाचाही राष्ट्रवादाचा स्वतःचा मार्ग असतो. कुणीतरी वेगळा मार्ग निवडत आहे, बिचारा सैनिक राष्ट्रवादाचा मार्ग निवडत आहे, बिचारा राजकारणी राष्ट्रवादाचा मार्ग निवडत आहे. काही लोकांचा तर खरोखरच स्वतःचा अजेंडा असतो.
मी हे म्हणत नाही की हे नैसर्गिक नाही, पण आपण सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करायला हवा. आपण एकत्र येण्याचा प्रयत्न करायला हवा आणि हे तेव्हाच होईल जेव्हा आपण हे विचार राजकारण्यांपर्यंत पोहोचवू, हे तुमचं काम आहे.
कंगनाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, ती शेवटची ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिनं माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट 1975 ते 1977 या काळात भारतात लावण्यात आलेल्या आणीबाणीवर आधारित होता.
