आटपाडी तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी यांनी राज्याच्या ठिकाणी रहावे 

आटपाडी तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नाहीत याबाबत वारंवार निवेदन देण्यात आली आहेत. मात्र निवेदन देऊन सुद्धा आज पर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. याबाबतची निवेदन मनसेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष शेतकरी सेना प्रकाश गायकवाड यांनी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, आटपाडी तालुक्यातील जनतेस आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या दाखल्यासाठी ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा लागत असतो मात्र ग्राम महसूल अधिकारी मुख्यालयाच्या ठिकाणी उपस्थित राहत नसलेने जनतेचे गैरसोय होत आहे.

तसेच संबंधित सर्व ग्राम महसूल आधिकारी, यांनी त्यांचा दैनंदिन नियोजित दौरा व नियोजित बैठक या बाबत सूचना फलक कार्यालयाच्या आवारात लावावा, परंतु असे सुचना फलक अटपाडी तालुक्यामध्ये अनेक कार्यालयात लावलेले दिसून येत नाहीत.

मात्र सजेच्या ठिकाणी ग्राम महसूल अधिकारी यांना शासनाने निवासस्थाने उपलब्ध करून दिली आहेत. त्या निवासस्थानी कोणीही ग्राम महसूल आधिकारी सजेच्या ठिकाणी राहत नाहीत तसेच ग्राम महसूल अधिकारी व मंडल अधिकारी यांचेवर खासगी व्यक्ती व एजंट कामावर ठेवल्यास योग्य कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी व तहसील कार्यालयातील शासकीय वाहनावर खाजगी चालक काम करत आहे व त्या चलकाकडून अनुसूचित प्रकार घडल्यास या जबाबदार कोण ? याची माहिती मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत योग्य ती कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा प्रकाश गायकवाड यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.