Kangana Ranaut : कंगनाच्या दणदणीत विजयानंतरही चाहते नाराज…..

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौ हिमाचल प्रदेशातील मंडीतून (Himachal Pradesh Mandi) विजयी झाली आहे. बॉलिवूड गाजवल्यानंतर आता दिल्ली गाजवायला कंगना सज्ज झाली आहे. कंगनाची मंडीतून संसदेत ग्रँड एन्ट्री झाल्याने सर्वत्र तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पण तिचे काही चाहते मात्र नाराज झाले आहेत.

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कंगनाने घोषणा केली होती,”निवडणूक जिंकले तर बॉलिवूड सोडून देईन”. त्यामुळे आता ‘पंगाक्वीन’ मंडीकरांना दिलेलं आश्वासन पूर्ण करत राजकारणातच स्वत:ला झोकून देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कंगनाने लोकसभेचं मैदान मारलं आहे. त्यामुळे आता ती बॉलिवूडचं मैदान सोडणार का? याकडे सर्वांच्याच नजरा आहेत. कंगना रनौतला बॉलिवूडची ‘पंगाक्वीन’ असे म्हटले आहे.

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा तिच्यावर निशाणा साधला होता. आजवर तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. पण गेल्या काही दिवसांत प्रदर्शित झालेले तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडले आहेत. आता तिच्या आगामी चित्रपटांचीही चाहत्यांना उत्सुकता आहे.