Anant & Radhika Wedding: अनंत राधिकाच्या लग्नातील वऱ्हाडी यांची संपूर्ण लिस्ट

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा बहुप्रतीक्षित लग्नसोहळा गेल्या वर्षभरापासून चर्चेत आहे. एक पूर्ण वर्ष अंबानी कुटूंब या आलिशान सोहळ्याची जय्यत तयारी करत असून आज १२ जुलैला हा लग्नसोहळा थाटात पार पडणार आहे.

संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या या लग्नसोहळ्याला अनेक मान्यवर देश-विदेशातून हजेरी लावणार आहेत. जाणून घेऊया या राजेशाही लग्नाला कोण ए लिस्ट पाहुणे हजेरी लावणार आहेत. या लग्नसोहळ्याच्या प्रत्येक कार्यक्रमाला संपूर्ण बॉलिवूडने हजेरी लावत चारचांद लावले होते. बॉलिवूडमधील सगळे प्रतिष्ठित कलाकार या लग्नसोहळ्याला हजर होते.

याशिवाय अनेक हॉलिवूडमधील कलाकार, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तिमत्व, आंतरराष्ट्रीय इन्फ्लुएन्सर्सही या सोहळयाला हजेरी लावणार असल्याचं म्हंटलं जातंय. या सोहळ्याला बॉलिवूडमधील सगळे ए लिस्ट दर्जा असलेले सेलिब्रिटीज सहभागी होणार आहेत. अमिताभ बच्चन आणि संपूर्ण बच्चन कुटूंब, शाहरुख खान आणि त्याचं कुटूंब, सलमान खान आणि त्याचा परिवार,

दीपिका पदुकोण-रणवीर सिंह, आलिया भट्ट-रणवीर कपूर, अक्षय कुमार आणि त्याचा परिवार आणि इतरही काही बडे सेलिब्रिटीज या सोहळ्याला हजर असतील. याशिवाय हॉलिवूडमधून कार्देशीयन सिस्टर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किम कार्देशीयन आणि क्लोई कार्देशीयन हजर राहणार आहेत.

याशिवाय डब्लू डब्लू ई स्टार प्रोफेशनल बॉक्सर जॉन सीना, माईक टायसन या लग्नसोहळ्याला हजर असणार आहेत. याशिवाय बॉलिवूडबरोबर हॉलीवूडमध्येही स्वतःचा दबदबा निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा-जोनासही या लग्नसोहळ्याला हजर राहणार असल्याचं म्हंटलं जातंय.

तर या लग्नसोहळ्याला भारतीय राजकारणातील सगळे महत्त्वपूर्ण चेहेरे हजर राहतील असं म्हंटलं जात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस पार्टीचे नेते सलमान खुर्शीद, दिग्विजय सिंह, सचिन पायलट,कपिल सिब्बल, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव हजर राहणार आहेत. या लग्नाच्या निमित्ताने भारतातील राजकारणातील कायम एकमेकांच्या विरोधात असणारे महत्त्वाचे चेहरे या लग्नाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत असं म्हणावं लागेल.

तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक बिझनेसमनही या लग्नात हजर राहून या जोडप्याला आशीर्वाद देणार आहेत. या यादीत अदानी ग्रुपचे गौतम अदानी, एचएसबीचे ग्रुप चेअरमन मार्क ट्युकर, मॉर्गन स्टॅनलीचे एमडी मिशेल ग्रिम्स, अडॉबीचे सीईओ शंतनु नारायण, मुबादलाचे एमडी खालदून अल मुबारक, सॅमसंगचे चेअरमन जय ली, लॉकहिड मार्टिनचे सीईओ जेम्स टायक्लेट, बीपीचे सीईओ मुरेन ऑकिनक्लॉस, टमासेकचे सीईओ दिलहान पिल्लई, एरिक्सनचे सीईओ बोर्जे एकहोम, एचपीचे प्रेसिडेंट एन्रिक लॉरेंस, नोकियाचे प्रेसिडेंट टॉमी युनिटो, जीआयसीचे सीईओ लिम चो कीयात, मोइलीस अँड कोचे व्हॉइस चेअरमन एरीक कॉन्टोर ही प्रतिष्ठित मंडळी हजेरी लावणार आहेत.

याशिवाय आंतरराष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाचे चेहरेही या लग्नाला हजर राहणार आहेत. युकेचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर, युकेचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन, फिफाचे अध्यक्ष गियानी इन्फनिटो, यूएस स्टेट सेक्रेटरी जॉन केरी, कॅनडाचे माजी पंतप्रधान स्टीफन हार्पर, मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नाशिद, टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष एच इ सामिया सुलु हसन, ऑस्ट्रियाचे माजी पंतप्रधान सॅबेस्टियन कुरझ, स्वीडिशचे माजी पंतप्रधान कार्ल बिल्ड अशी दिग्गज व्यक्तिमत्त्व हजेरी लावणार आहेत.