ज्योतिषशास्क्रानुसार, शनिदेव आपल्या कर्माची फळं आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये देतात. आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टी आपल्या कुंडलीतील ग्रहांच्या स्थानावर असते. आपल्या कुंडलीतील कोणत्याही प्रकारच्या महत्त्वाच्या गोष्टी ग्रहांशी संबंधित असतात. शनिदेव आपल्याला आपल्या कर्मांनुसार प्रगती आणि शिक्षा या दोन्ही गोष्टी देतात. आपल्या आयुष्यातील चांगले आणि वाईट प्रगंग आपल्या कर्मानुसार घडत असतात. हिंदू शास्त्रानुसार, शनि ग्रहाला क्रुर मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेव सर्व ग्रहांपेक्षा हळू गोचर करतो. एखाद्या राशीमध्ये शनिदेव अडीच वर्ष वास करतात. सध्या शनिदेव कुंभ राशीमध्ये भ्रमण करत आहेत.
शनिदेव मार्च महिन्यातील 29 तारखेला कुंभ राशीतून बाहेर पडेल. शनिदेव 29 मार्च रोजी कुंभ राशी सोडून मीन राशीत प्रवेश करतील. शनिदेव मीन राशीत मावळत्या अवस्थेत प्रवेश करतील. यानंतर, 6 एप्रिल रोजीच शनिदेव मीन राशीत उदयास येतील. 6 एप्रिल रोजी सकाळी 5:05 वाजता शनिदेव मीन राशीत उगवेल. मीन राशीत शनिदेवाच्या उदयामुळे काही राशीच्या लोकांचे भाग्य उजळू शकते. या काळात काही राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात लाभ मिळू शकतो. अशा परिस्थितीत, या भाग्यवान राशींबद्दल जाणून घेऊया.
कर्क राशी – कर्क राशीच्या लोकांसाठी शनिदेवाचा उदय खूप शुभ ठरू शकतो. कर्क राशीच्या नवव्या घरात शनिदेवाचा उदय होईल. या काळात कर्क राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढू शकतो. उत्पन्नात वाढ होऊ शकते. तुम्हाला आनंद आणि सौभाग्य मिळू शकते. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळू शकते. जीवनात शांती येईल. वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले असेल.
कन्या राशी – कन्या राशीच्या लोकांसाठी शनिदेवाचा उदय खूप फायदेशीर ठरू शकतो. कन्या राशीच्या ७ व्या घरात शनिदेवाचा उदय होईल. या काळात कन्या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. संपत्ती आणि समृद्धी वाढू शकते. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो. व्यवसायात नफा होऊ शकतो. तुम्ही नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता. आदर वाढेल.
धनु राशी – धनु राशीच्या लोकांसाठी शनिदेवाचा उदय खूप अनुकूल ठरू शकतो. धनु राशीच्या चौथ्या घरात शनिदेवाचा उदय होईल. या काळात धनु राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. कठोर परिश्रम करिअरमध्ये यश मिळवू शकतात. या काळात कुटुंबाशी असलेले संबंध अधिक गोड होतील.