आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून दलितवस्त्यांमध्ये सीसीटिव्हीसाठी २.५० कोटीचा निधी मंजूर

इचलकरंजी शहर हे वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असून शहराच्या वाढत्या औद्योगिकरणाबरोबरच शहराचा विस्तार आणि लोकसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे शहराच्या प्रत्येक भागात सुरक्षितता रहावी, अनुचित प्रकारांना आळा बसावा या दृष्टीने सीसीटिव्ही कॅमेरे उपयुक्त ठरतात. सीसीटिव्हीमुळे अनेक वाईट गोष्टी टाळता येतात. त्यासाठी इचलकरंजी शहरातील महानगरपालिका हद्दीतील विविध दलित वस्त्यांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी आमदार राहुल आवाडे यांनी जिल्हा नियोजनकडे केली होती.

त्या संदर्भातील प्रस्ताव महानगरपालिकेच्या वतीने पाठविण्यात आला होता. त्याला साहित्यरत्न लोकशाहिर आण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना २०२४- २५ अंतर्गत मंजूरी मिळून २ कोटी ५० लाखाचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. यातून विविध १६ ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून हे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे.