इचलकरंजीत महाविकास आघाडीचा स्मार्ट, प्रिपेड मीटरला विरोध…..

इचलकरंजी शहरात सध्या अनेक विकासकामे सुरु आहेत. तसेच नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अनेक नेतेमंडळी पुढाकार देखील घेत असल्याचे चित्र दिसतच आहे. सध्या शहरात स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्याच्या अनेकांचा विरोध असल्याचे दिसून येत आहे. इचलकरंजीत महाविकास आघाडीच्यावतीने महावितरणचे मुख्य अभियंता राठी यांची भेट घेऊन स्मार्ट व प्रिपेड मिटर बसवणेचे कामाला विरोध दर्शवला. चार तालुक्यात दिलेल्या स्थगिती प्रमाणे इचलकरंजी शहरात ही स्थगिती देण्यात यावी, अशी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी श्री. राठी यांनी स्मार्ट मिटर बसवणेचे काम केवळ दोष युक्त मिटर साठी असुन सरसकट मिटर बसवणेत येणार नसलेचे सांगितले व मिटरचा कोणताही खर्च वीज ग्राहकांकडून वसुल केला जाणार नाही, असे सांगितले. यावेळी मीटर बसविण्याबाबत जबरदस्ती होत असेल तर महाविकास आघाडी तीव्र विरोध करेल असे आघाडीचे प्रमुखांनी सांगितले. यावेळी शशांक बावचकर, संजय कांबळे, प्रकाश मोरबाळे, सयाजी चव्हाण, रणजीत जाधव, सदा मलाबादे, राजु आलासे, शशिकांत देसाई आदी उपस्थित होते.