इचलकरंजी येथे विश्व हिंद परिषद आणि बजरंग दल यांच्यावतीने छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबची कबर पूर्णपणे काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढत शिष्टमंडळातर्फे प्रांताधिकारी यांची भेट घेऊन कबर न काढल्यास हिंदू समाजाला बरोबर घेऊन ती उद्ध्वस्त करण्यात येईल असा इशाराही दिला. शिष्टमंडळाने प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांची भेट घेऊन चर्चा केली.
आंदोलनात शिवप्रसाद व्यास, अमित कुंभार, सुजित कांबळे, प्रविण सामंत, बाळासाहेब ओझा, युवराज सावंत, मुकेश दायमा, प्रमोद पाटील, व्यंकटेश ओझा, विनायक पोवार, मंगेश मस्कर, उमाकांत दाभोळे, दिगंबर भिलुगडे, कैलाशचंद्र शर्मा, गणेश कांदेकर, – मुकुंदराज उरुणकर, सुहास माळी, रविकिरण हुक्केरीकर, राज गळतगे, सर्जेराव कुंभार यांच्यासह हिंदूत्ववादी कार्यकर्ते सहभागी झाले होते.