अनुभवी फलंदाज विराट कोहली याने आयपीएलच्या 18 व्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध शानदार अर्धशतकी खेळी केली. केकेआरने आरसीबीला विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं होतं. आरसीबीकडून या विजयी धावांचा पाठलाग करताना विराट कोहली आणि फिलीप सॉल्ट या सलामी जोडीने 8.3 ओव्हरमध्ये 95 धावांची भागीदारी केली. विराटने 30 बॉलमध्ये अर्धशतक केलं. विराटने 36 बॉलमध्ये नाबाद 59 धावांची खेळी केली. आरसीबीने विराटवर 7 विकेट्सने विजय मिळवला. विराटने या सामन्यात एक महारेकॉर्ड केला. विराटच्या या कामगिरीसाठी बीसीसीआयने सन्मान केला.
हंगामातील सलामीच्या सामन्याआधी रंगारंग कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी याने विराटला स्मृतीचिन्ह देत सन्मानित केलं. या स्मृतीचिन्हावर ‘IPL 18’ असा उल्लेख आहे. आयपीएल स्पर्धेतील हा 18 वा हंगामा आहे. तसेच विराटचा जर्सी नंबरही 18 आहे. तसेच विराटचाही हा खेळाडू म्हणून 18 वा हंगाम आहे. विराट पहिल्या हंगामापासून आरसीबीसाठी खेळतोय.
विराटचा दिग्ग्जांच्या यादीत समावेश
विराटने केकेआरविरुद्धच्या सामन्यासाठी मैदानात उतरताच इतिहास रचला. विराटचा हा 400 वा टी 20 सामना ठरला. विराट 400 टी 20 सामना खेळणारा तिसरा भारतीय ठरला. सर्वाधिक टी 20 सामने खेळण्याचा विक्रम रोहित शर्मा याच्या नावावर आहे. रोहितने 448 तर दिनेश कार्तिक याने 412 टी 20 सामने खेळले आहेत.
सामन्याचा धावता आढावा
दरम्यान आरसीबीने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. केकेआर कॅप्टन अजिंक्य रहाणे आणि सुनील नारायण या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर केकेआरला शेवटच्या 10 ओव्हरमध्ये 67 धावाच करता आल्या. आरसीबीने केकेआरला 174 धावांवर रोखलं. त्यानंतर आरसीबीकडून विराट आणि सॉल्ट या सलामी जोडीने 175 धावांचा पाठलाग करताना कडक सुरुवात केली. सलामी जोडीने पावरप्लेमध्ये बिनवाद 80 धावा केल्या. आरसीबीने हे आव्हान 22 बॉलआधी 3 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. आरसीबीने अशाप्रकारे विजयी सलामी दिली.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, सुनील नरेन, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, रसिक दार सलाम, सुयश शर्मा, जोश हेजलवुड आणि यश दयाल.