केंद्र सरकारने 8 व्या वेतन आयोगाची नुकतीच घोषणा केली आहे. त्यानंतर महागाई भत्ता देण्याचे जाहीर झाले. सरकारने 16 जानेवारी 2025 रोजी 8 व्या वेतन आयोग स्थापण्याचे जाहीर केले. त्याच्या शिफारशी 1 जानेवारी 2026 रोजीपासून लागू होतील.केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ते आणि सेवा निवृत्तीधारकांसाठी महागाई दिलासा रक्कमेत वाढीसाठी आता जास्त वाट पाहावी लागणार नाही. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत यावर अखेरचा निर्णय घेण्यात येईल. जर या महागाई भत्त्याला मंजूरी मिळाली तर नवीन DA जानेवारी 2025 लागू होऊ शकतो. म्हणजे कर्मचार्यांचा मार्च महिन्यातील पगार वाढू शकतो. त्यांना दोन महिन्यांची थकबाकी पण मिळेल.
आनंदावर पडणार विरजण
गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकार होळीच्या जवळपास DA मध्ये वाढीची घोषणा करत आहे. पण यंदा कर्मचाऱ्यांना पदरात निराशा पडू शकते. अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार, यंदा DA मध्ये केवळ 2 टक्क्यांच्या वाढीची शक्यता आहे. जी गेल्या 7 वर्षांतील डीएच्या तुलनेत सर्वात कमी असेल. जुलै 2018 मध्ये सरकारने डीएमध्ये कमीत कमी 3% वा 4% ची वाढ केली आहे. काही वेळा तर यापेक्षा पण ती अधिक राहिली. त्यामुळे यंदा महागाई भत्त्यामध्ये केवळ दोन टक्के वाढ त्यांच्या आनंदावर विरजण पडण्यासारखे आहे.
AICPI निर्देशांकावर सर्व गणित
कर्मचाऱ्यांना वर्षांतून जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्ता लागू करण्यात येतो. पण प्रत्येक वर्षी डीएची घोषणा उशीरा करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता निश्चित करण्यासाठी केंद्र सरकार अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकांचा AICPI-IW (All India Consumer Price Index- Industrial Worker) आधार घेते. ही आकडेवारी कामगार मंत्रालय जाहीर करतो. त्यानंतर सरकार मागील 6 महिन्यांचे AICPI-IW डेटा विश्लेषण करून पुढील 6 महिन्यांसाठी DA वाढीचा दर निश्चित करते.
जुलै 2018 नंतरची सर्वात कमी वाढ
जुलै 2018 नंतर म्हणजेच सुमारे 78 महिन्यानंतर महागाई भत्त्यामध्ये (DA) 2% वाढ ही सर्वात कमी असेल. यापूर्वी जुलै ते डिसेंबर 2018 या कालावधीत सर्वात कमी वाढ झाली होती, आणि त्यावेळीही 2% वाढ करण्यात आली होती.