कोल्हापुरातील सर्वपक्षीयांचा जलविद्युत प्रकल्पाला पाणी देण्यास विरोध!

 मित्रानो आजकाल पाण्याची खूपच टंचाई भासत आहे. पावसाचा अभाव यामुळे पुढील च्या काळात आपणाला पाण्याची टंचाई भासणार आहे. पाण्यामुळे खुपच सगळ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. शेतकरी खूपच हवालदिल झालेला आहे. भागाला नदीतून पिण्याचे पाणी देण्यास विरोध होत असताना आता कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव धरणातून कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात अदानी समुहाच्या प्रकल्पाला पाणी देण्यास संघटित विरोध होऊ लागला आहे.

पाटगाव धरण बचाव कृती समितीच्या वतीने गारगोटी येथील तहसील कार्यालयासमोर सर्वपक्षीय आंदोलन झाले. स्थानिक नेतृत्वाने एक थेंबही पाणी देणार नाही असा निर्धार केला असल्याने ८ हजार ५०० कोटी रुपये गुंतवणुकीच्या २१०० मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पाच्या उभारणीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख नेते या प्रश्नी कोणती भूमिका घेणार यावर या आंदोलनाची तीव्रता ठरणार आहे.