सांगोला पोलीस स्टेशनचा बदलला ‘लूक’; ऑक्सिजन पार्क, बगिचा आणि व्यायाम सुविधा

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी वार्षिक तपासणी कामानिमित्त शुक्रवार दिनांक २१ मार्च रोजी सांयकाळच्या सुमारास भेट दिली. यावेळी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड आदी उपस्थित होते. सर्वप्रथम सांगोला पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना सलामी गार्ड व पो. नि. खणदाळे यांनी सलामी दिली, त्यानंतर परेड निरीक्षण करण्यात आले.

सांगोला पोलीस स्टेशन परिसरात नव्याने उभारलेले अनोखा ‘ऑक्सिजन पार्क’ आणि व्यायाम सुविधा यांचे फित कापून मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. तसेच हॉलीबॉल मैदानाचेही पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी फित कापून उदघाटन केले. नव्या मैदानावर स्वतः पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड व इतर पोलिसांनी हॉलीबॉल खेळाचा आनंद घेतला. इमारतीची रंगरंगोटी व भौतिक सुविधाची पहाणी करून निसर्गरम्य परिसर केल्याबद्दल कौतुक करत सांगोला पोलीस स्टेशनचा बदलेला ‘लूक’ पाहून पोलीस महानिरीक्षक यांनी ‘व्हेरी गुडची’ प्रतिक्रिया दिली असल्याचे समजते. मान्यवरांच्या हस्ते पोलीस स्टेशन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

त्यानंतर सांगोला शहरातील टाऊन हॉल येथे पोलीस पाटील संघटना व इतर सामाजिक संघटनांकडून पोलीस महानिरीक्षक यांचे स्वागत व सत्कार कार्यक्रम पार पडला. यावेळी स. पो. नि. सचिन जगताप, पवन मोरे, उपनिरीक्षक विनायक माहुरकर, पोपट काशीद स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी चंद्रकांत पुजारी श्रीकांत जाधव यांच्यासह सांगोला पोलीस उपस्थित होते.