सार्वजनीक गणेश मंडळांनी सामाजीक सलोख्याची परंपरा कायम ठेवावी-डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख

सध्या महाराष्ट्रासह देशभर गणेशोस्तव मोठ्या थाटामाटाने व भक्तीभावाने साजरा केला जातो.गावोगावी व घरोघरी गणेशाची प्राण प्रतिष्ठापना केली जाते.घरोघरी आनंदाचे वातावरण असते.गावोगावी व अनेक शहरांमध्ये सार्वजनीक गणेश मंडळे गणपती बसवत आसतात.

या मंडळाध्ये अनेक जाती-धर्माची वेगवेगळी तरुण मुले सहभागी असतात.या मंडळाच्या माध्यमातुन गणेशोस्तव काळात जास्तीत जास्त सामाजीक उपक्रम राबवणे गरजेचे आहे.काही सार्वजनीक गणेश मंडळांमध्ये रक्तदान शिबिरे ,खाऊ वाटप,शालेय साहित्य वाटप,वकृत्व स्पर्धा,रांगोळी स्पर्धा आसे‌ एक ना अनेक उपक्रम राबवत असतात.

आशा मंडळाचे अनुकरण इतरही मंडळांनी केले तर हा गणेशोस्तव आणखीन चांगल्या प्रकारे साजरा होईल.गणेशोस्तव मंडळांनी महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजीत केला गेला तर वेगवेगळ्या समाजातील स्रीया या एकत्रीत येऊ शकतात त्यां महिलांमध्ये सुसंवाद घडु शकतो‌.विचारांची देवाण घेवाण होऊ शकते व यातुन समाजातील सर्व धर्म समभाव आपोआपच वाढीस लागला जातो.

असे अनेक सामाजीक उपक्रम आहेत.पारंपारीक खेळ, सांस्कृतीक कार्यक्रम,विविध स्पर्धा आहेत याचे आयोजन मंडळांनी केलेच पाहिजे.आज गावोगावी विविध समाजातील व विविध धर्मातील तरुण मुले एकत्रीत येऊन मोठ्या प्रमाणात गणेशोस्तव साजरा केला जात आहे. आशा वेळेस सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजीक सलोख्याची असलेली आपली परंपरा कायम ठेवण्यासाठी जाणीवपुर्वक वेगवेगळ्या माध्यमातुन प्रयत्न केले पाहिजेत असे मत पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त