शिवसेना लोकसभेच्या २० जागा लढणार कोल्हापूर, हातकणंगलेवर ठाकरे गटाचा दावा!

लोकसभेच्या २० जागा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची शिवसेना इंडिया आघाडीतून लढेल, अशी खात्रीलायक माहिती गुरुवारी रात्री सूत्रांकडून मिळाली. कोल्हापूर, हातकणंगले या दोन्ही जागा शिवसेनेला इंडिया आघाडीतून सुटतील. असे असले तरी गुरुवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाने हातकणंगलेची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटावी, अशी विनंती केल्याची चर्चा साखराळेपासून दादरपर्यंत सुरु राहिली.

गेल्यावेळी ज्या जागा शिवसेना ठाकरे गटाने जिंकल्या त्या सगळ्याच जागा सुटाव्यात, त्याशिवाय काही जागा मिळाव्यात असे सूत्र पुढे आले असल्याची चर्चा आहे.

पण, राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी जी जागा जिंकण्याची हमी ती जागा त्या पक्षाला असे सूत्र अवलंबण्याची सूचना केल्याचे गुरुवारीच कळाले. त्यामुळे २० मधील हातकणंगले ही जागा कदाचित राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटेल. त्यासाठी गुरुवारी विनंती झाल्याची
चर्चा आहे.

कोल्हापूरच्या जागेवरही राष्ट्रवादीने हक्क सांगितल्याची चर्चा आहे. खूप मोठा उमेदवार पक्षाकडे येथे आहे. पण, पहावे लागेल, ऐनवेळी अतिशय आदर असणारा उमेदवार राष्ट्रवादी शरद पवार गटातून की शिवसेनेच्या ठाकरे गातून निवडणुकीसाठी उभा राहतो.