विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा भव्य अनावरण व लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते तर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मा. आम. शहाजीबापू पाटील यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रध्देय डॉ. भिमराव यशवंत आंबेडकर, विधानसभेचे उपसभापती आण्णा दादू बनसोडे, पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, सार्वजनिक कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबीटकर, ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, खा. धैर्यशील मोहिते पाटील, खा. प्रणितीताई शिंदे, आम. डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
सांगोला विद्यामंदिर प्रशाला पटांगणामध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला शिंदे साहेब संबोधित करणार आहेत. यासह पत्रकारांशी संवाद साधताना, १० तारखेला सोन्याचा दिवस उगवणार आहे. आपल्या सर्वांच्या अभिमानाची तारीख आहे. मानव जातीला सुखकर जीवन जगण्याचा मार्ग दिला. सर्वांना समान न्याय हक्क दिला, संविधान दिले आणि त्यासंविधानामुळे आपण एकजूट आहोत. अशा विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहत असताना एक मनस्वी आनंद होत आहे. यामध्ये जयंती उत्सव मंडळाचा अभिमान वाटतो. एवढा मोठा पुतळा कोणाकडे न जाता उभा करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे कौतुक आहे. जातीपातीच्या पलीकडे मी आंबेडकरवादी आहे. यामुळे या कार्यक्रमाला सर्वात मोठा निधी दिला यामुळे मला आजही आनंद आहे. असेही मा. आम. शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.