मुंबईतील वांद्रे येथील मातोश्री परिसरात नुकतेच एक लक्षवेधी दृश्य दिसून आले ठाकरे बंधूंना (brothers) एकत्र येण्याचे आवाहन करणारी बॅनरबाजी. ‘मराठी माणूस वाट पाहत आहे.. लवकर एकत्र या’ असा ठळक मजकूर या बॅनरवर छापलेला असून, त्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित जुना फोटो बॅनरवर झळकत आहे.
या बॅनरमुळे दोन्ही नेत्यांमधील संभाव्य युतीच्या चर्चांना नवसंजीवनी मिळालेली आहे. राजकीय वर्तुळात सध्या ठाकरे बंधूंनी (brothers) पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरु असून, या पार्श्वभूमीवर ठाणे, गिरगावनंतर आता थेट ठाकरे कुटुंबीयांच्या निवासस्थानासमोर अशा बॅनरचे दर्शन झाल्याने ही चर्चा जास्त च वाढू लागली आहे.
या बॅनरवरील मजकूर विशेषतः मनाचा ठाव घेणारा आहे ‘अभिनंदन ठाकरे बंधूंनो, लवकर एकत्र या, मनापासून एकत्र या.’ मराठी जनतेच्या भावना आणि आशा यांचे प्रतिबिंब या संदेशात स्पष्टपणे दिसते. सध्याच्या राजकीय वातावरणात महाराष्ट्रातील मराठी माणूस ठाकरे कुटुंबातील ऐक्याच्या प्रतीक्षेत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय एकतेची अपेक्षा जनतेला असून, अशा सार्वजनिक बॅनरबाजीमुळे या युतीची शक्यता जास्त च चर्चेत आली आहे.