आमदार अपात्रता प्रकरणावर आज ‘सर्वोच्च’ सुनावणी! शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आज फैसला होणार?

शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आमदार अपात्रता प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या शिवसेनेच्या आमदारांना आणि अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना अपात्र केले नव्हतं.

म्हणून उद्धव ठाकरे गटाकडून आणि शरद पवार गटाकडून याचिका दाखल करण्यात आली होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीकडे दोन्ही राजकीय पक्षांसोबत संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्र केलं नाही.

त्यामुळे ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. मागच्या आठवड्यात कोर्टाने या सुनावणीसाठी ३ तारखा निश्चित केल्या होत्या. मात्र त्यावर सुनावणी झाली नव्हती.सुप्रीम कोर्टाने जरी आजची तारीख निश्चित केली असली तरी प्रकरण नंबर खूप खाली असल्याने प्रकरण सुनावणीला येण्याची शक्यता कमी आहे.

त्यामुळे आज याप्रकरणावर सुनावणी होते की नाही यावर प्रश्नचिन्हच आहे. ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या वकिलांनी प्रकरण मेंशन केलं तर लवकरची तारीख कोर्ट निश्चित करू शकते. कोर्ट सुनावणीसाठी कधीची तारीख देते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.