Pahalgam Terror Attack : बाबत मोठी बातमी दहशतवाद्यांचा पर्यटकांवर हल्ला

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील दहशतवादी (terrorist) हल्ल्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. पहलगाममधील दहशतवाद्यांना पाकिस्तानमधून कमांड मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्याचे नेतृत्व स्वत: पाकिस्तानी दहशतवाद्याने केले असल्याची माहिती मिळाली आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 पेक्षा अधिक जखमी असल्याचे वृत्त आहे. काश्मीर खोऱ्यात झालेल्या या दहशतवादी हल्ल्याने देशभरात खळबळ माजली आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी (terrorist) हल्ल्याचे नेतृत्व स्वतः पाकिस्तानी दहशतवाद्याने केले होते. या हल्ल्यात जवळपास 6 दहशतवादी सहभागी होते. या दहशतवाद्यांकडे AK-47 सारख्या रायफल होत्या. दक्षिण काश्मीरमधील कोकेरनाग, पुलवामा आणि शोपियान भागात सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरू आहे.