जवळे ता. सांगोला रोडनजीक व कोरडा नदीच्या तीरावर असलेल्या श्री. दत्त मंदिरामध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री. दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असून त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दिनांक २० डिसेंबर ते मंगळवार दिनांक २६ डिसेंबर पर्यंत दररोज पहाटे ५ ते सकाळी ६ वाजेपर्यंत गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण सुरू करण्यात आले आहे. तसेच मंगळवार दि. २६ डिसेंबर श्री. दत्त जयंती दिवशी दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत श्री. नारायणदेव भजनी मंडळ जवळे यांचा भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
त्यानंतर ठीक ६ वाजता श्री. दत्त मूर्तीवर पुष्पवृष्टी होणार आहे. त्यानंतर महाप्रसाद होईल. तरी सर्व कार्यक्रमाचा जवळे गाव व जवळे पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा. असे आवाहन समस्त ग्रामस्थ जवळे यांनी केलं आहे.